
टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीनं स्वत:ला सुपर फिट केलं आहे, तर दुसरीकडे तिची मुलगीही कमी नाही. श्वेता प्रमाणेच तिची मुलगी पलकही तिचे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारीचे नवे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये पलक खूपच सुंदर दिसत आहे. तिनं हे फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.

श्वेता सध्या केप टाउनमध्ये 'खतरों के खिलाडी' या रिअॅलिटी टीव्ही शोसाठी शूटिंग करत आहे, तर तिची मुलगी पलक तिवारी आपल्या बोल्ड फोटोंमुळे सोशल मीडियाचा पारा वाढवत आहे.

पलकनं गुलाबी रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये तिचे फोटो शेअर केले आहेत. फोटोंमध्ये तिनं खुले केस आणि साधं मेकअप केलं आहे. त्यामुळे ती खूपच सुंदर दिसत आहे.

अनेक सेलिब्रिटींनीही पालकच्या फोटोंवर कमेंट्स केल्या आहेत आणि तिचं कौतुक केलं आहे. पलक सोशल मीडियावर खूप अॅक्टिव आहे आणि तिची फॅन फॉलोइंग देखील आहे.