
बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टीचा जन्म 5 नोव्हेंबर 1992 रोजी मुंबईत झाला. अभिनेता सुनील शेट्टी आणि माना शेट्टी यांची मुलगी अथिया ही घरातील सर्वांची लाडकी आहे. आज अथिया तिचा 29 वा वाढदिवस साजरा करत आहे.

अथिया सोशल मीडियावर खूप अॅक्टिव असते, ती अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते.

अथिया शेट्टीने न्यूयॉर्क फिल्म अकादमीमधून अभिनयाचे शिक्षण घेतले आहे.

अथियाने चित्रपटात काम केले नसेल. पण ती अनेकदा तिच्या अफेअरच्या बातम्यांमुळे चर्चेत असते. मीडिया रिपोर्ट्सनुसार अथिया आणि क्रिकेटर केएल राहुलला डेट करत आहे.

अभिनेता नवाजुद्दिन सिद्दीकीसह ती ‘मोतीचूर चकनाचूर’ या चित्रपटात झळकली होती.