
बॉलिवूड अभिनेत्री अर्चना पूरन सिंहचा (Archana Puran Singh) जन्म 26 सप्टेंबर रोजी डेहराडूनमध्ये झाला. तिने 1987 मध्ये आदित्य पांचोलीसोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. मात्र, पहिल्यांदाच अर्चना केवळ 10 सेकंदांसाठी ‘निकाह’ चित्रपटातील एका गाण्यात दिसली होती. अर्चनाने तिच्या अभिनय कारकिर्दीत अधिक सहाय्यक भूमिका साकारल्या. त्यानंतर अभिनयच्या बळावर अर्चनाने खूप नाव कमावले आहे. तथापि, तिच्या वैयक्तिक जीवनात बरेच अडथळे आले आहेत.

अर्चनाने 1992मध्ये अभिनेता परमीत सेठीशी लग्न केले. अर्चनाचे याआधीही लग्न झाले होते? एवढेच नाही तर, घटस्फोटानंतर अर्चनाचा प्रेमावरील विश्वास उडाला होता. अर्चनाची परमीतसोबतची लव्हस्टोरी एका कार्यक्रमादरम्यान सुरू झाली. दोघेही एकमेकांच्या इतके प्रेमात पडले की, हे नाते साताजन्मासाठी बांधले गेले.

अर्चना परमीतच्या सुंदर दिसण्यावर भाळली, तर अर्चनाचे सौंदर्य आणि विचारांची स्पष्टता पाहून परमीत तिच्या प्रेमात पडला. एकमेकांवरील प्रेम व्यक्त केल्यानंतर, परमीत आणि अर्चना यांनी लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. ज्यावेळी दोघांनीही हा निर्णय घेतला होता, त्यावेळेस दोघांनीही अशाप्रकारे लग्नाआधी एकत्र राहणे ही एक मोठी गोष्ट होती. काही काळ या लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर दोघांनी 30 जून 1992 रोजी लग्न केले.

लग्नाच्या अनेक वर्षानंतर अर्चना एका मुलाखतीत म्हणाली होती की, 'लग्न हे नात्याला दिलेले नाव आहे. हे प्रेमाचे बंधन आहे ज्यात दोन लोक एकमेकांसाठी सर्वकाही करू शकतात. जेव्हा आम्ही दोघांनी लिव्ह-इनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला होता, तेव्हा आम्ही दोघे एकमेकांच्या पाठीशी उभे राहिलो. आमच्या मुलांना ओळख देण्यासाठी आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला.’

आजकाल अर्चना पूरन सिंह ‘द कपिल शर्मा शो’मध्ये परीक्षकाच्या भूमिकेत दिसत आहेत. 'श्रीमान श्रीमती जी' या मालिकेतून तिचे नाव खूप प्रसिद्ध झाले. वयाच्या 18व्या वर्षी ती मुंबईत आली आणि त्यानंतर तिने जाहिरातींमध्ये काम करण्यास सुरुवात केली. अर्चना ‘लव्ह स्टोरी 2050’, ‘मोहब्बतें’, ‘क्रिश’, ‘कुछ कुछ होता है’, ‘मस्ती’ आणि ‘बोल बच्चन’ सारख्या चित्रपटांमध्ये दिसली आहे.