Happy Birthday Reema Lagoo | कधी प्रेमळ तर, कधी स्वतःच्याच मुलावर गोळी झाडणारी चित्रपट सृष्टीची लाडकी ‘आई’ रीमा लागू!

| Updated on: Jun 21, 2021 | 12:00 PM

बॉलिवूडमध्ये अशा अनेक सशक्त अभिनेत्री आहेत, ज्यांनी आईच्या भूमिकेला चित्रपटाच्या पडद्यावर अत्यंत कृतज्ञतेने जगले आहे. या यादीमध्येच एका अशा अभिनेत्रीचे देखील नाव आहे, जिने प्रेक्षकांच्या मनावर ‘आई’ बनून राज्य केले. आज आपण बोलत आहोत बॉलिवूडच्या प्रसिद्ध दिवंगत अभिनेत्री रीमा लागू (Reema Lagoo) यांच्याबद्दल...

1 / 6
बॉलिवूडमध्ये अशा अनेक सशक्त अभिनेत्री आहेत, ज्यांनी आईच्या भूमिकेला चित्रपटाच्या पडद्यावर अत्यंत कृतज्ञतेने जगले आहे. या यादीमध्येच एका अशा अभिनेत्रीचे देखील नाव आहे, जिने प्रेक्षकांच्या मनावर ‘आई’ बनून राज्य केले. आज आपण बोलत आहोत बॉलिवूडच्या प्रसिद्ध दिवंगत अभिनेत्री रीमा लागू (Reema Lagoo) यांच्याबद्दल... 21 जून 1958 रोजी त्यांचा जन्म झाला होता. आज अभिनेत्री आपल्यात नाही, पण त्यांचे असे अनेक उत्तम चित्रपट आणि पात्र आहेत जे लोक नेहमी लक्षात ठेवतील. 18 मे 2017 रोजी त्यांचे निधन झाले. रीमा लागू यांनी मराठी चित्रपटांतून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले, त्यानंतर त्यांनी बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले.

2 / 6
मैने प्यार किया : 1989मध्ये प्रदर्शित झालेला 'मैने प्यार किया' हा चित्रपट त्या काळातील सुपरहिट चित्रपट ठरला. या चित्रपटात रीमा लागू यांनी सलमान खानच्या आईची भूमिका साकारली होती. आईने आपल्या मुलावर मोठा विश्वास ठेवला हे या चित्रपटातून प्रथमच दाखवले गेले. या सिनेमात त्यांचे नाव कौशल्या होते. जे आपल्या मुलाला त्याच्या वैयक्तिक आयुष्यापासून ते त्याच्या प्रेमापर्यंत खूप आधार देते.

3 / 6
हम आपके हैं कौन : 1994 चा सुपरहिट चित्रपट ‘हम आपके हैं कौन’ हा रीमा यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा चित्रपट होता. या चित्रपटात रीमाने माधुरी दीक्षित आणि रेणुका शहाणे यांच्या आईची भूमिका साकारली होती. या चित्रपटात एक अनुपम खेर यांनी त्यांच्या पतीची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील त्यांची भूमिका चांगलीच पसंत केली गेली.

4 / 6
हम साथ साथ हैं : 1997 मध्ये आलेला ‘हम साथ साथ हैं’ हा चित्रपट खूप धमाकेदार चित्रपट ठरला होता. या चित्रपटाची कथा, या चित्रपटाची स्टारकास्ट, या चित्रपटाची गाणी सर्व धमाकेदार होती. या चित्रपटात सलमान खान, सैफ अली खान, मोहनीश बहल आणि नीलम कोठारी मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटात त्यांनी प्रेक्षकांना प्रेमळ आईची ‘ममता’ दाखवली. हा चित्रपट रिलीज झाल्यापासून ते आतापर्यंत लोक आवडीने पाहतात.

5 / 6
वास्तव : 1999 पर्यंत सिनेमात बराच बदल घडला होता. त्यावेळी बॉलिवूडमध्ये अंडरवर्ल्डचा कहर वाढत होता. त्यावेळी असा एक चित्रपट प्रदर्शित झाला, ज्याने प्रेक्षकांना चकित केले. हा चित्रपट होता ‘वास्तव’. या चित्रपटात अभिनेत्रीने संजय दत्तच्या आईची भूमिका साकारली होती. जी एक दिवस स्वत:च्या हाताने आपल्या मुलाला गोळी मारते. त्या काळात या चित्रपटाने मिळवलेले कौतुक आजपर्यंत कोणत्याही मोठ्या चित्रपटाला मिळालेले नाही.

6 / 6
काल हो ना हो : शाहरुख खानचा चित्रपट ‘कल हो ना हो’ हा एक उत्तम चित्रपट होता. या चित्रपटात रीमा यांनी शाहरुख खानच्या आईची भूमिका साकारली, जी या चित्रपटात खूप आजारी व्यक्तीरेखा होती. चित्रपटातील रीमाची व्यक्तिरेखा प्रेक्षकांना खूप आवडली. ज्यामुळे हा चित्रपट वर्षातील सर्वात मोठा हिट चित्रपट ठरला होता.