
टीव्ही अभिनेत्री रिद्धी डोगराला प्रत्येक जण ओळखतो. ती टीव्हीच्या लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. रिद्धीनं 2007 मध्ये ‘झूम जिया रे’ या शोद्वारे आपल्या करिअरची सुरुवात केली.

रिद्धीने अनेक शो मध्ये काम केलं आहे आणि तिला जास्तीत जास्त लोकप्रियता मिळाली ती ‘कब तक’मधून. या शोमध्ये रिद्धीसोबत राकेश मुख्य भूमिकेत होता.

रिद्धी आणि राकेश या शोच्या माध्यमातून एकमेकांच्या जवळ आले आणि दोघांनी लग्न केलं. मात्र, त्यांचं लग्न फार काळ टिकलं नाही आणि दोघंही गेल्या वर्षी विभक्त झाले.

रिद्धी अरुण जेटली यांची भाची आहे. टीव्ही व्यतिरिक्त ती वेब शोमध्येही काम करत आहे.

नुकतंच, रिद्धी ‘द मॅरिड वुमन’ वेब शोमध्ये दिसली होती ज्यात मोनिका डोगरासोबत तिचा किसिंग सिन चर्चेत होता.