
नताशा आणि हार्दिक यांची ओळख 2018 मध्ये झाली होती. त्यानंतर हार्दिकने अभिनेत्रीला 2020 मध्या प्रपोज केला आणि दोघांनी लग्न केलं. त्यांना एक मुलगा देखील आहे. पण गेल्या काही दिवसांपासून हार्दिक - नताशा यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला आहे.

हार्दिक पांड्याच्या पहिल्या पब्लिक रिलेशनशिपबद्दल बोलायचे झाले तर, त्याचं नाव कोलकाता स्थित मॉडेल लीशा शर्मासोबत जोडलं गेलं होतं. त्यांच्या अफेअरच्या बातम्याही सामान्य होत्या. पण 2017 मध्ये दोघांचं ब्रेकअप झाल्याचं समोर आलं. करियरचं कारण सांगत दोघांनी त्यांचे मार्ग वेगळे केले.

अभिनेत्री एली अवराम हिच्यासोबत देखील हार्दिक याच्या रिलेशनशिपच्या चर्चांनी जोर धरला होता. जेव्हा एलीने 2017 मध्ये हार्दिकचा भाऊ क्रुणालच्या लग्नाला हजेरी लावली तेव्हा चर्चा अधिक तीव्र झाल्या. त्यानंतर 2018 मध्ये दोघांचे ब्रेकअप झालं.

हार्दिक पांड्या याच्या नावाची चर्चा अभिनेत्री उर्वशी रौतेला हिच्यासोबत झाली होती. दोघांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट करण्यात आल्यानंतर दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चांनी जोर धरला. पण दोघांनी फक्त मैत्री असल्याचं सांगितलं.

हार्दिक पांड्या याच्या नावाची चर्चा अभिनेत्री परिणीती चोप्रा हिच्यासोबत झाली होती. परिणीती चोप्राने ट्विटरवर एक फोटो पोस्ट केला होता. ज्याच्या कॅप्शनमध्ये त्याने प्रेमाचा इशारा दिला होता. जिथे पांड्यानेही प्रतिक्रिया दिली. पण नंतर परिणीती चोप्राने ट्विटरवर त्यांचे संभाषण केवळ एका फोनच्या प्रमोशनमुळे झाल्याचं स्पष्ट केलं होतं. आज परिणीती राजकारणी राघव चढ्ढा यांची पत्नी आहे.

अभिनेत्री शिबानी दांडेकर आणि फरहान अख्तर आज पती-पत्नी आहेत. पण एक काळ असा होता जेव्हा शिबानी आणि पांड्या यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा रंगल्या होत्या. पण रंगणाऱ्या चर्चा फक्त अफवा असल्याचं हार्दिक याने सांगितलं होतं.