
अभिनेत्री हीना खान प्रत्येक वेळी तिच्या नवीन लूकने चाहत्यांची मनं जिंकते. ती आपले ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. हीना सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे.

आता हीनाने काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये तिचे बोल्ड फोटो शेअर केले आहेत, ज्यामुळे चाहत्यांच्या नजरा दूर हटत नाहीत. यासह, तिचा मेकअप खूप हटके दिसत आहे.

हीनाने एक नवीन फोटोशूट केलं आहे ज्यात ती ब्लॅक कलरचा शॉर्ट ड्रेस परिधान करून दिसत आहे. यासह तिने बूट कॅरी केले आहेत. हीनाच्या आउटफिटसोबत मेकअप आणि हेअरस्टाईल छान दिसत आहे.

हीनाने स्मोकी आय मेकअप केला आहे आणि हाफ पोनी केली आहे. ती या फोटोंमध्ये कमालीची सुंदर दिसतेय.

1 लाखापेक्षा जास्त लोकांनी हीनाचे हे फोटो पसंत केले आहेत आणि चाहते स्वतःला कमेंट करण्यापासून रोखू शकत नाहीत. एका वापरकर्त्याने लिहिलं - विलक्षण. तर दुसऱ्याने लिहिलं - उत्कृष्ट.