
‘ये रिश्ता क्या कहलाता है’ ही छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय मालिका ठरली. या मालिकेत हीना खाननं मुख्य भूमिका साकारली होती तर करण मेहरासुद्धा या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत होता. या मालिकेतून हीनाला खास ओळख मिळाली.

या मालिकेनंतर हीना खाननं बिग बॉस या रिअॅलिटी शोमध्ये एन्ट्री घेतली. बिग बॉसमध्येही तिनं कमालीचं काम केलं.

आता हीना खाननं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर लेटेस्ट फोटोशूटचे काही फोटो शेअर केले आहेत ज्यात ती टपोरी अवतारात दिसली आहे.

हीना खाननं हे फोटोशूट लोअर, टॉप, स्पोर्ट शूज, डिझायनर ग्लासेस आणि कॅप घालून केलं आहे. तिनं अनेक वेगवेगळ्या स्टाईलमध्ये पोज दिल्या आहेत.

हीना खाननं ज्या लूकमध्ये हे फोटोशूट केलं आहे त्याच लूकमध्ये तिनं नुकतंच एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यामध्ये ती 'क्रिकेट का बादशाह बन' गाण्यावर डान्स करताना दिसली. तिचे हे फोटो चाहत्यांच्याही पसंतीस उतरत आहेत.