
टीव्ही अभिनेत्री दिशा परमार सध्या पती राहुल वैद्यसोबत सुट्ट्या एन्जॉय करत आहे. हे नवविवाहित जोडपं मालदीव व्हेकेशनवर आहेत. या दरम्यान दिशा आणि राहुल दोघंही सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत.

दिशा सतत मालदीवमधील स्वतःचे आणि तिच्या पतीची खास फोटो शेअर करत आहे.

आता तिने नव्या फोटोंमध्ये तिचा बोल्ड अवतार दाखवला आहे. या नवीन फोटोंमध्ये दिशा बिकिनीमध्ये दिसत आहे.

गुलाबी आणि काळ्या रंगाच्या बिकिनीमध्ये तिने वेगवेगळ्या स्टाईलमध्ये पोज दिल्या आहेत.

फोटोंमध्ये तिने बिकिनीवर श्रग घातलेली दिसत आहे.

यातील काही फोटोंमध्ये ती पती राहुल वैद्य सोबतही दिसत आहे. सध्या, दिशाची ही बोल्ड स्टाईल चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.