
मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या आयकॉनिक गोल्ड अवॉर्ड्स 2021 मध्ये टीव्ही स्टार्सची दमदार कामगिरी पाहायला मिळाली. छोट्या सरदारनी मधील सहर यावेळी एका वेगळ्याच अंदाजात दिसली, तर आपल्या डोळ्यांनी सर्वांना घायाळ करणाऱ्या एरिकानं रेड कार्पेटवर आपली जादू दाखवली.

बिग बॉस ओटीटीच्या विजयानंतर आता दिव्या अग्रवाल एका वेगळ्या स्टाईलमध्ये दिसली. दिव्या पांढऱ्या ड्रेसमध्ये खूप सुंदर दिसत होती. तिची ही स्टाईल निश्चितच तिच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरली असणार.

सुरभी चंदनाने आयकॉनिक अवॉर्ड्समध्ये काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दमदार एंट्री केली. एंट्री दरम्यान सुरभीने सर्वांशी बिग बॉस 15 आणि तिच्या आगामी प्रोजेक्ट्स बद्दल खूप चर्चा केली.

अशनूर कौर आणि शायनी दोशी यांना आयकॉनिक पुरस्कार 2021 मध्ये अवॉर्ड्स देण्यात आले. या अवॉर्ड शोमध्ये अश्नूर निळ्या रंगाच्या गाऊनमध्ये दिसली, तर शायनी या शोमध्ये सिल्व्हर रंगाच्या गाऊनमध्ये दिसली.

आपल्या लूकसोबतच नेहमीच एक्सपेरिमेंट करणाऱ्या हीना खाननं रेड कार्पेटवर हिरव्या सूटमध्ये एंट्री केली. शाहीर शेख तिला रेड कार्पेटवर कंपनी देत होता. नुकतंच दोघांनी एका म्युझिक व्हिडीओमध्ये एकत्र काम केले आहे.