
वर्ल्ड टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदा, सुपर डान्सर चॅप्टर 4 मध्ये पाहुणे म्हणून आलेल्या संगीता बिजलानी आणि जॅकी श्रॉफ यांनी रोमँटिक डान्स करुन सर्वांना चकित केलं.

आज संगीता आणि जॅकी श्रॉफ यांनी 'गली गली में फिरता है' या गाण्यावर स्टेजवर डान्स केला.

संगीता बिजलानी यांनी जॅकी श्रॉफसोबत 'त्रिदेव', 'लक्ष्मण रेखा' आणि 'इज्जत' सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

'त्रिदेव' मधील जॅकी आणि संगीतावर चित्रीत केलेलं 'गली गली में फिरता है' हे गाणे आजही खूप प्रसिद्ध आहे.

आता पुन्हा या दोघांचा डान्स पाहून प्रत्येक चाहत्याच्या हृदयाची धडधड वाढली.

32 वर्षांनंतरही जॅकी श्रॉफ आणि संगीता बिजलानी यांची केमिस्ट्री पाहून अनुराग बासू आणि टेरेन्स लुईस यांनी त्यांना स्टँडिंग ओव्हेशन दिले.