
अभिनेत्री जॅकलिन फर्नांडीस (Jacqueline Fernandez) हिला आज कोणत्या ओळखीची गरज नाही. अभिनेत्रीने आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं.

जॅकलिन फक्त तिच्या सिनेमांमुळेच नाही तर, लूकमुळे देखील चर्चेत असते. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा प्रत्येक लूक आवडतो.

कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असणारी जॅकलिन आता तिच्या हटके अदांमुळे चर्चेत आली आहे.

सोशल मीडियावर जॅतकलिन हिचे काही फोटो तुफान व्हायरल होत आहेत. अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो पोस्ट करत चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.

गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री जॅकलीन आरोपी सुकेश चंद्रशेखर याच्यामुळे तुफान चर्चेत आहे. सुकेश अभिनेत्रीला तुरंगातून प्रेमपत्र पाठवतो.