
अमेरिकन सिटकॉम शो द बिग बँग थिअरीमुळे मोठा हंगामा होताना दिसत आहे. या मालिकेच्या एका एपिसोडमध्ये अभिनेत्री माधुरी दीक्षित हिच्याबद्दल अपमानजनक शब्द वापरण्यात आले आहेत.

इतकेच नाहीतर या मालिकेच्या एपिसोडमध्ये माधुरी दिक्षित हिची तुलना थेट ऐश्वर्या राय हिच्यासोबत करण्यात आलीये. या सर्व प्रकारानंतर बाॅलिवूडच्या अनेक कलाकारांनी संताप व्यक्त केलाय.

या मालिकेमध्ये चक्क माधुरी दिक्षित हिचा अपमान करण्यात आल्याने चाहत्यांमध्ये देखील मोठा रोष आहे. आता या सर्व प्रकरणात जया बच्चन यांनीही मोठे भाष्य करत खडेबोल सुनावले आहेत.

जया बच्चन म्हणाल्या की, हा माणूस वेडा आहे का? अतिशय चुकीची भाषा. त्याला पागल खाण्यात पाठवण्याची गरज आहे. त्यांच्या कुटुंबियांना याबद्दल काय वाटते ते विचारले पाहिजे.

या मालिकेमध्ये माधुरी दिक्षित हिचा अपमान करण्यात आल्याने बाॅलिवूडच्या अनेक कलाकारांनी नाराजी व्यक्त केलीये. जया बच्चन यांनी एका मुलाखतीमध्ये नाराजी व्यक्ती केलीये.