AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हृतिकशी प्रेमसंबंध असो किंवा थेट ठाकरेंशी पंगा.. Kangana Ranaut म्हणजे फटाक्यांची माळ

बॉलिवूडची 'क्वीन' अर्थात अभिनेत्री कंगना रनौत तिच्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाते. कंगनाने अभिनयकौशल्याच्या जोरावर इंडस्ट्रीत आपली वेगळी ओळख निर्माण केली. मात्र गेल्या काही वर्षांत, ती विविध वादांमुळे सर्वाधिक चर्चेत राहिली. बेधडक वक्तव्यांसाठी ती प्रसिद्ध आहे. याच वक्तव्यांमुळे तिला अनेकदा ट्रोलिंगचाही सामना करावा लागला. कंगना 'कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन' कोणत्या घटनांमुळे ठरली, ते पाहुयात..

| Edited By: | Updated on: Mar 23, 2022 | 7:24 AM
Share

1 / 9
1947 मध्ये आपल्याला मिळालेलं स्वातंत्र्य म्हणजे 'भीक'- टाइम्स नाऊ समिट 2021 मध्ये कंगना म्हणाली, '1947 मध्ये मिळालेलं स्वातंत्र्य म्हणजे 'भीक' होती, भारतातील नागरिकांना 2014 मध्ये खरं स्वातंत्र्य मिळालं.' पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 2014 च्या निवडणुकीतील विजयाचा संदर्भ देत ती असं म्हणाली होती. मात्र या वक्तव्यातून कंगनाने भारताच्या स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान केला, अशी टीका अनेकांनी केली.

2 / 9
हृतिक रोशनसोबतचं नातं-  क्रिश या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान हृतिकसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचा दावा कंगनाने 2013 मध्ये केला होता. मात्र, हृतिकने ते स्पष्टपणे नाकारलं. दोघांनी एकमेकांवर अनेक आरोप-प्रत्यारोपही केले. कंगना आणि हृतिकचा वाद त्यावेळी चांगलाच गाजला होता.

3 / 9
आंदोलक शेतकऱ्यांना म्हणाली 'दहशतवादी'- केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी कायद्यांवर शेतकरी आंदोलन करत असताना, गायिका रिहानाने याविषयी एक ट्विट केलं होतं. शेतकरी आंदोलनाच्या मीडिया कव्हरेजबद्दल तिने प्रश्न उपस्थित केला होता. तिच्या ट्विटला प्रत्युत्तर देताना कंगना म्हणाली, आंदोलन करणारे शेतकरी नसून देशाचं विभाजन करण्याचा प्रयत्न करणारे दहशतवादी आहेत.

4 / 9
मुंबईची पाकिस्तानशी तुलना- मूव्ही माफियांपेक्षा मुंबई पोलिसांची अधिक भीती वाटते असं म्हणत कंगनाने 2020 मध्ये मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी (पीओके) केली होती. तिच्या या वक्तव्यावर राजकीय प्रतिक्रियाही उमटल्या होत्या. या वादादरम्यान, महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कंगनाच्या प्रॉडक्शन हाऊसला बेकायदेशीर बांधकामावरून नोटीस बजावली. महापालिकेकडून कंगनाच्या ऑफिसवर तोडक कारवाईसुद्धा करण्यात आली होती. मात्र, नंतर मुंबई उच्च न्यायालयाने बीएमसीच्या या निर्णयाला स्थगिती दिली.

5 / 9
सुशांतच्या हत्येचा आरोप- अभिनेता सुशांत सिंह राजपूतला इंडस्ट्रीतील काही वाईट गुपितं माहित असल्याने त्याची हत्या करण्यात आली होती, असा आरोप कंगनाने त्यावेळी केला होता. तिच्या या वक्तव्यावरूनही मोठा वाद निर्माण झाला होता. सुशांत वांद्रे इथल्या राहत्या घरी मृतावस्थेत आढळला होता.

6 / 9
करण जोहरवर घराणेशाहीचा आरोप- हा वाद 2010 मध्ये सुरू झाला, जेव्हा कंगनाने पहिल्यांदा चित्रपट निर्माता करण जोहरच्या कॉफी विथ करण या टेलिव्हिजन चॅट शोमध्ये हजेरी लावली. तिथे तिने करणवर घराणेशाहीचा आरोप केला होता. त्यावरून मोठी चर्चा रंगली होती. तेव्हापासून करणसोबत तिचं भांडण सुरू आहे.

7 / 9
 ड्रग्ज टेस्ट- कंगनाने तिच्या एका ट्विटमध्ये बॉलिवूडमधील कलाकारांवर ड्रग्ज सेवनाचा आरोप केला होता. बॉलिवूडमधल्या मोठ्या स्टार्सची ड्रग्ज टेस्ट करावी, अशी मागणी तिने केली होती.

8 / 9
बी-ग्रेड अभिनेत्री म्हणून टीका- कंगनाने एका मुलाखतीत अभिनेत्री स्वरा भास्कर आणि तापसी पन्नू यांना ‘बी-ग्रेड अभिनेत्री’ असं म्हटलं होतं. तिच्या या वक्तव्यावरून स्वरा आणि तापसीनेही सडेतोड उत्तर दिलं होतं. त्यानंतर तिने अभिनेत्री सोनम कपूर आणि दिया मिर्झा यांच्यावरही टीका केली.

9 / 9
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.