
कपिल शर्मा याचा ज्विगाटो हा चित्रपट 18 मार्च रोजी रिलीज झालाय. याच दिवशी राणी मुखर्जी हिचा मिसेज चटर्जी वर्सेज नॉर्वे हा चित्रपट रिलीज झाला. दुसरीकडे रणबीर कपूर याचा चित्रपटही चांगली कमाई करताना दिसत आहे.

राणी मुखर्जी मिसेज चटर्जी वर्सेज नॉर्वे या चित्रपटाचे खास प्रमोशन करताना दिसली नाही. मात्र, ज्विगाटो या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना कपिल शर्मा हा दिसला. या चित्रपटात कपिल शर्मा हा एका डिलीवरी बाॅयच्या भूमिकेत आहे.

राणी मुखर्जी आणि कपिल शर्मा यांच्या चित्रपटाची ओपनिंग काही खास झाली नाही. या दोन्ही चित्रपटाकडे ओपनिंग डेला प्रेक्षकांनी पाठ फिरवली. आता विकेंडचा फायदा राणी मुखर्जी हिच्या चित्रपटाला झाल्याचे दिसत आहे.

ज्विगाटो चित्रपटाने शुक्रवारी 43 लाख, शनिवारी 62 लाख आणि रविवारी 75 लाख म्हणजेच चित्रपटाचे एकून कलेक्शन आतापर्यंत 1.80 कोटी झाले आहे. निर्मात्यांना या चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा होत्या.

मिसेज चटर्जी वर्सेज नॉर्वे या चित्रपटाने शुक्रवारी 1.27 कोटी, शनिवारी 2.26 कोटी, रविवारी 3 कोटी म्हणजेच चित्रपटाचे एकून कलेक्शन हे 6.73 कोटी झाले आहे. कपिल शर्मा याच्या चित्रपटापेक्षा राणी मुखर्जी हिचा चित्रपट चांगली कमाई करत आहे.