
अभिनेत्री कतरिना कैफ हिला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत कतरिना हिने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं.

बॉलिवूडमध्ये काम करत असताना कतरिना हिचं नाव अनेक सेलिब्रिटींसोबत जोडण्यात आलं. अभिनेता सलमान खान याच्यासोबत देखील कतरिना हिच्या नावाची चर्चा झाली.

अनेकांसोबत कतरिना हिच्या रिलेशनशिपची चर्चा रंगल्या. पण जेव्हा अभिनेत्रीने अभिनेता विकी कौशल याच्यासोबत लग्नाचा निर्णय घेतला तेव्हा चाहत्यांना मोठा धक्का बसला.

विकी आणि कतरिना यांनी अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर लग्नाचा निर्णय घेतला. मोठ्या शाही थाटात दोघांनी लग्न केलं.

सोशल मीडियावर देखील दोघांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. कतरिना कायम पती विकी याच्यासोबत फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.