
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेल नोरा फतेही (Nora fatehi) हे सध्या सोशल मीडियावर आपल्या नवीन फोटोंमुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्री एका हटके अवतारात दिसली होती.

अतिशय हॉट अँड बोल्ड अवतारातील तिचं नवं फोटोशूट सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. तिचे हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत.

बॉलिवूडची सध्याची टॉप डान्सर नोरा फतेही (Nora Fatehi) हिने आज स्वत:च्या कलेने आपले नाव कमावले आहे. अभिनेत्री तिच्या आयटम साँग्ससाठी बरीच प्रसिद्ध आहे.

डान्सर आणि अभिनेत्री असणाऱ्या नोराचा जन्म कॅनडामध्ये झाला होता. तिची स्टाईल पाहताच तिचे चाहते मंत्रमुग्ध होतात. हार्डी संधूच्या ‘नाह’ (Naah) या गाण्याद्वारे नोरा फतेहीने इंडस्ट्रीमध्ये जोरदार एंट्री केली. या गाण्यातील नोराच्या अदा पाहून प्रत्येकजण तिचा दिवाना झाला.

अभिनेत्रीचे हे गाणे हिट ठरताच, ती टी-सीरीजच्या अनेक गाण्यांमध्ये दिसू लागली. नोराला बर्याच वेळा सर्वोत्कृष्ट डान्सरचा पुरस्कारही मिळाला आहे. शिवाय तिचे फोटो नेहमीत चाहत्यांच्या पसंतीस उतरत असतात. या फोटोंवर सुद्धा चाहत्यांनी पसंती दर्शवली आहे.