
आर्यन खान याचे नाव ड्रग्स केसमध्ये आल्यावर शाहरुख खान याची मॅनेजर पूजा ददलानी चर्चेत आली. कारण यावेळी पूजा ददलानी ही सतत कोर्टामध्ये दिसत होती. आर्यन खान याला भेटण्यासाठी ती गाैरी खान हिच्यासोबत पोहचली होती.

पूजा ददलानी ही 2012 पासून शाहरुख खान याचे सर्व काम सांभाळत आहे. विशेष म्हणजे तिने यापूर्वी शाहरुखचे प्रॉडक्शन हाऊस रेड चिलीज एंटरटेनमेंटही सांभाळले आहे. आता ही शाहरुख खान याचे संपूर्ण काम पाहते.

रिपोर्ट्सनुसार, पूजा ददलानी हिची एकून संपत्ती ही 50 कोटी आहे. पूजा हिचे शिक्षण मुंबईमध्ये झाले आहे. तिने मास्क कम्युनिकेशनमध्ये बॅचलर डिग्री देखील घेतली आहे.

शाहरुख खान याच्यासोबतच नाही तर त्याच्या कुटुंबियांसोबतही पूजा ददलानी हिचे खूप चांगले संबंध आहेत. पूजा दललानी हिने 2008 मध्ये हितेश गुरनानी यांच्यासोबत लग्न केले. या दोघांची एक मुलगी देखील आहे.

नुकताच पूजा दललानी ही नव्या घरामध्ये शिफ्ट झालीये. ज्याचे इंटीरियर डिझायनिंग गौरी खान हिने केले आहे. याचे काही फोटोही गाैरी खान हिने सोशल मीडियावर शेअर केले होते.