
अभिनेत्री सायानी गुप्ताने अत्यंत कमी वेळेमध्ये स्वत: ची एक वेगळी ओळख नक्कीच निर्माण केलीये. सायानी तिच्या अभिनयामुळे चर्चेत असते.

आज सायानी गुप्ताचा 37 वा वाढदिवस आहे. सायानी सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते आणि आपल्या चाहत्यांसाठी फोटो देखील शेअर करते.

प्रसिद्ध दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांच्या दिग्दर्शनात सायानीने गौराची भूमिका साकारली होती. या भूमिकेमुळेच सायानीला एक खरी ओळख मिळालीये.

अॅमेझॉन प्राइम व्हिडिओच्या प्रसिद्ध वेब सीरिजमध्ये सायानीने रॉयची भूमिका साकारली होती. ही वेब सीरिज देखील चाहत्यांना प्रचंड आवडली होती.

गेल्या काही दिवसांपासून सायानी आपल्या चाहत्यांसाठी बोल्ड फोटो शेअर करत आहे. विशेष म्हणजे सायानीचे हे खास फोटो तिच्या चाहत्यांना देखील प्रचंड आवडत आहेत.