
मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडित तिच्या अभिनयाप्रमाणेच सौंदर्य आणि तिच्या तेजाज्ञा या ब्रँडमुळेच चर्चेत असते. ती सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. नवनवीन फोटोशूट करत ती चाहत्यांशी कनेक्ट होते.

आता तेजस्विनीनं काही सुंदर फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिनं स्वत:च्या ब्रँडची क्लासी साडी परिधान केली आहे.

फोटो सुंदर आहेतच मात्र तिनं दिलेल्या कॅप्शननं चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. कॅप्शनमध्ये तेजस्विनीनं चाहत्यांना साडी नेसण्याचा सल्ला दिला आहे.

तेजस्विनीनं फोटो शेअर करत लिहिलं ‘कोणीही कितीही आधुनिक कपड्यात सुंदर दिसण्याचा प्रयत्न करा पण साडीचं सौंदर्य काही औरच ! त्यातून स्वतः design केलेली साडी असेल तर ती नेसणे होते आणखी खास ! ता.क. - मनात कधीही फॅशनबद्दल शंका असेल तर साडी नेसा.’

'तेजाज्ञा'या ब्रॅन्डचा सध्या चांगलाच दबदबा पाहायला मिळतोय. या ब्रॅन्डचे एकापेक्षा एक कपडे आता ट्रेंडमध्ये आहेत.