
बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित सध्या सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती तिच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित अपडेट शेअर करताना दिसतेय. तिनं नुकतंच तिचा एक थ्रोबॅक फोटो शेअर केला आहे ज्यात तिची ग्लॅमरस स्टाईल दिसत आहे.

धकधक गर्ल माधुरी दीक्षितनं स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे ज्यात ती ऑफ शोल्डर ब्लू आणि व्हाईट प्रिंटेड मॅक्सी ड्रेसमध्ये दिसत आहे.

या दरम्यान, तिनं कमीतकमी मेकअप केलं आहे आणि नेहमीप्रमाणे खूप सुंदर दिसत आहे. यासोबत तिनं सनग्लासेस देखील कॅरी केले आहेत.

माधुरीने फोटोसह कॅप्शनमध्ये लिहिलं - मी त्या संघर्षांसाठी आभारी आहे कारण त्या संघर्षांच्या आधारे मी आज जे काही आहे ते झाले आहे. माधुरीनं फोटो शेअर केल्यानंतर चाहत्यांनी त्यावर लाईक आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.

चाहते माधुरीच्या या फोटोवर वेगवेगळे इमोजी शेअर करताना दिसत आहेत. माधुरी दीक्षित हे चित्रपट क्षेत्रातील एक मोठं नाव आहे. ती 90 च्या दशकातील आघाडीची अभिनेत्री आहे आणि त्यानंतरही तिनं आपली कीर्ती कायम ठेवली आहे.