
बॉलिवूडची धक धक गर्ल माधुरी दीक्षित अनेकदा तिच्या फॅशन सेन्समुळे चर्चेत असते. माधुरीचे येताच सोशल मीडियावर व्हायरल होतात. पुन्हा एकदा माधुरी एथनिक लूकमध्ये दिसली आहे.

माधुरीने या फोटोशूटमध्ये फ्लोरल साडी घातलेली दिसते आहे. या फोटोंमध्ये माधुरीचे केस सुंदर दिसत आहे. नेहमीप्रमाणे तिचा क्लासिक लूक दिसत आहे.

माधुरी निळ्या सिल्क ऑर्गेजा साडीमध्ये दिसत आहे. ज्यावर फ्लोरची डिझाईन करण्यात आली आहे.

या साडीवर माधुरीने हलका मेकअप केला असून गालावर बेरी टोन्ड लिप शेड, स्लीक आयलाइनर, मस्करा, आयलॅश केले आहे.

माधुरीने डिझायनर राहुल मिश्राच्या कलेक्शनमधील ही साडी घातलेली आहे. जर तुम्हाला ही साडी खरेदी करायची असेल, तर तुम्ही ती डिझायनरच्या अधिकृत वेबसाइटवरून खरेदी करू शकता. या साडीची किंमत 1,79,000 रुपये आहे.