

वेस्टर्न असो किंवा पारंपारिक, दीपिका प्रत्येक लुकमध्ये अप्रतिम दिसते. आता दीपिकाचे हे सुंदर फोटो पाहा.

दीपिका पिवळ्या आणि ग्रे शेडच्या साडीमध्ये खूप सुंदर दिसत आहे. दीपिकानं केबीसी 13 च्या ग्रँड फ्रायडे एपिसोडसाठी हा पोशाख परिधान केला आहे ज्यात ती फराह खानसोबत गेम खेळण्यासाठी येणार आहे.

दीपिकाच्या चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर, ती शेवटची 2020 साली प्रदर्शित झालेल्या छपाक चित्रपटात दिसली होती. चित्रपटातील दीपिकाच्या कामाचं खूप कौतुक झालं.

सध्या दीपिकाकडे अनेक चित्रपट आहेत जे रिलीजसाठी सज्ज आहेत. या यादीमध्ये पठाण, 83 आणि चित्रपट निर्माते शकुन बत्रा यांच्या अनटाईन चित्रपटाचा समावेश आहे.