
अभिनेत्री शालिनी हिने 'महाराज' सिनेमात किशोरी नावाच्या मुलीची भूमिका पार पाडली आहे. सिनेमात झुनैद आणि किशोरी यांचा साखरपुडा झाल्याचं दाखवण्यात आलं आहे.

सिनेमात पारंपरिक लूकमध्ये दिसणारी शालिनी खऱ्या आयुष्यात प्रचंड हॉट आणि ग्लॅमरस दिसते. सध्या तिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

शालिनी हिने पांढऱ्या रंगाचा क्रॉप टॉप आणि जीन्समध्ये काही फोटो पोस्ट आहेत. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक प्रचंड आवडला आहे.

शालिनी हिने आतापर्यंत तेलुगु, तमिळ आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. पण 'महाराज' सिनेमामुळे शालिनी हिच्या लोकप्रियतेत वाढ झाली आहे.

शालिनी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.