
सिनेविश्व, अभिनय क्षेत्र हे फारच विचित्र आहे. या क्षेत्रात रोज नवनवी आव्हाने निर्माण होतात. सामाजिक प्रथा, परंपरा यांचा अडसर दुर सारून कलाकारांना त्यांचे करिअर घडवावे लागते. यात महिलांच्या वाट्याला येणारा संघर्ष तर फार मोठा असतो.

दरम्यान, छोट्या पडद्यावर प्रसिद्ध असलेल्या अशाच एका अभिनेत्रीने मुल होत नव्हते म्हणून तिच्यासोबत घडलेल्या भयानक प्रसंगांचीआठवण सांगितली आहे. या अभिनेत्रीचे नाव माही विज असे आहे. ही अभिनेत्री सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते.

सोबतच तिचे इन्स्टाग्रावर लाखोंनी फॉलोअर्स आहेत. माही विज आणि जय भानुशाली या दोघांनी लग्न केले होते. या दोघांनही नुकताच घटस्फोट घेतला आहे. तिला सुरुवातीला मुल होत नव्हते. पाच वर्ष प्रयत्न केल्यानंतर आयव्हीएफच्या माध्यमातून तिला मुलगी झाली.

परंतु मुलगी होत नव्हती त्यामुळे तिला बरेच टोमणे मारले जायचे. तिने नुकताच 'द मेल फेमिनिस्ट'ला एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत तिने तिला मिळालेल्या वागणुकीबद्दल सांगितले आहे. लोक तिला अपशकुनी समजायचे. मुल होत नसल्याने तिला ओटी भरण्याच्या कार्यक्रमाला बोलवले जात नसे.

महिला ती अपशकुनी असल्याचे वाटायचे, असे तिने सांगितले आहे. तिला दोन जुळे बाळ झाले होते. परंतु ते जगू शकले नाहीत. परंतु आता तिला आयव्हीएफ तंत्रज्ञानातून एक मुलगी झालेली आहे. जय भानुशालीपासून ती वेगळी राहते. दोघांचाही घटस्फोट झालेला आहे.