
मलायका अरोरा लवकरच एका रिअॅलिटी शोचा भाग बनणार आहे. या शोचं नाव आहे 'सुपर मॉडेल ऑफ द इयर सीझन 2' आहे. मलायकाचा या शोमधून लूक समोर आला आहे, जो की प्रचंड किलर आहे.

मलायका अरोरा सध्या चित्रपटांमध्ये सक्रिय नसली, तरी ती अनेकदा टीव्ही शोमध्ये जजची भूमिका साकारताना दिसते. मलायका अरोरा आता पुन्हा एकदा एका शोमध्ये जजची भूमिका साकारणार आहे आणि त्या शोचं नाव आहे 'सुपर मॉडेल ऑफ द इयर 2'.

मलायका अरोरानं या शोच्या सुरुवातीला स्वतःचा एक व्हिडीओ शेअर केला आणि हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय. आता मलायकाच्या या जबरदस्त लूकचे फोटो व्हायरल होत आहेत.

मलायका अरोरा स्वतः एक मॉडेल आहे आणि तिनं 'सुपर मॉडेल ऑफ द इयर 2' साठी एक मॉडेल लूक देखील दिला आहे.

सुपरमॉडेल ऑफ द इयरचा दुसरा सीझन 22 ऑगस्टपासून एमटीव्हीवर रिलीज होणार आहे. मलायका अरोरा व्यतिरिक्त, शोमध्ये मिलिंद सोमण आणि अनुषा दांडेकर देखील जज असणार आहेत.

मलायका अरोरानं तिच्या खास गाण्यांद्वारे बॉलिवूड चित्रपटांमध्ये जबरदस्त ओळख निर्माण केली आहे. तिनं 'छैय्या छैय्या', 'अनारकली' आणि 'मुन्नी बदनाम' सारखी सुपरहिट गाणी दिली आहेत.