
जान्हवी कपूरनं नुकतंच तिचे थ्रोबॅक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन फोटो शेअर करत तिनं आपल्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे - 'वाइल्डफ्लॉवर वाइल्डफायर'. जान्हवीच्या या फोटोंमध्ये दिग्दर्शक शरण शर्मा आहेत.

धूसर दिसत असलेल्या पहिल्या फोटोमध्ये जान्हवी कपूर आपला चेहरा झाकून पळताना दिसत आहे.

या कलेक्शनच्या दुसर्या फोटोत ती रिसॉर्टच्या गवतात आराम करताना दिसतेय.

या फोटोत दिग्दर्शक शरण शर्मा आणि राजकुमार संतोषीची मुलगी तनिषा संतोषीही जान्हवीसोबत दिसत आहेत.

या फोटोत जान्हवी सूर्यास्ताकडे पाहताना दिसत आहे. कोरोनाची दुसर्या लाट येण्याआधी जान्हवी मालदीवमध्ये सुट्टीसाठी गेली होती.

यापूर्वी ती सुट्टीसाठी गोव्याला गेली होती आणि अमेरिकेत तिची बहीण खुशी कपूरला भेटण्यासाठी सुद्धा गेली होती.

जान्हवीला नुकतंच ‘रुही’ या हॉरर-कॉमेडी चित्रपटात पाहिले गेलं होतं. जान्हवी कपूरनं आनंद एल रायच्या 'गुड लक जेरी' चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केलं आहे. तिच्याकडे चित्रपट निर्माता करण जोहरची 'दोस्ताना 2' देखील आहे. 2008 मध्ये रिलीज झालेल्या चित्रपटाचा हा सिक्वल आहे. या चित्रपटात प्रियांका चोप्रा, अभिषेक बच्चन आणि जॉन अब्राहम मुख्य भूमिकेत होते.