
छोट्या पडद्यावरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या लोकप्रिय मालिकेतील अंजलीच्या भूमिकेमुळे अभिनेत्री अक्षया देवधर (Akshaya Deodhar) घराघरात पोहोचली. खरं तर अंजलीपेक्षा ‘पाठकबाई’ हीच तिला मिळालेली खरी ओळख.

अक्षया देवधर सोशल मीडियावर अत्यंत सक्रिय असते. ती तिचे वेगवेगळ्या लूकमधील फोटो सतत चाहत्यांसोबत शेअर करत असते. नुकतेच अक्षयाने तिचे नवे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अक्षया प्रचंड सुंदर दिसतेय.

मालिका ऑफ एअर गेल्यानंतर अक्षयला कामातून उसंत मिळाली आहे. दरम्यान, तिने तिच्या जुन्या मित्र-मैत्रिणींच्या भेटी घेण्यासही सुरुवात केली आहे. सध्या ती तिच्या मैत्रिणींबरोबर धमाल करताना दिसते.

अक्षया सध्या स्वतःच्या फिटनेसकडे लक्ष देत असून, जिम ट्रेनिंग आणि व्यायामाचे फोटो-व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते.

अगदी काहीच महिन्यांपूर्वी ही मालिका ऑफ एअर गेली आहे. मात्र, तरीही चाहत्यांच्या मनातील ‘अंजली बाई’ बद्दलचे प्रेम तसूभरही कमी झालेले नाही.

आता अंजलीच्या या फोटोला सोशल मीडियावर चांगलीच पसंती मिळते आहे. तिचे हे फोटो धुमाकूळ घालत आहेत.