
14 मेपासून 'कान फिल्म फेस्टिव्हल'ची सुरुवात झाली आहे. या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या फिल्म फेस्टिव्हलमध्ये मराठी अभिनेत्रीने हजेरी लावली.

अभिनेत्री छाया कदम हिने 'कान फिल्म फेस्टिव्हल'ला हजेरी लावली यावेळी तिने अस्सल मराठमोळा लूक केला होता. नथ अन् साडी छायाने नेसली होती.

आई तुला विमानातून फिरवण्याचे माझे स्वप्न अधुरे राहिलं. पण आज तुझी साडी आणि नथ मी विमानातून कान्स फिल्म फेस्टीव्हल पर्यंत घेऊन आले, याचं समाधान आहे, असं म्हणत छायाने फोटो शेअर केलेत.

तरी आई ! आज तू हवी होतीस. हे सगळं पाहण्यासाठी. Love you मम्मुडी आणि खूप खूप मिस यू, अशी भावनिक पोस्ट शेअर केलीय.

संगीतकार ए. आर. रहमान आणि छाया यांची भेट झाली. कान फिल्म फेस्टिव्हलच्या निमित्ताने ही भेट होणं आणि निवांत अर्धा तास गप्पा मारत फ्रान्सच्या रस्त्यांवर फिरत फिरत शेवटी एक सेल्फी होणे म्हणजे, 'इन बहारों में दिल की कली खिल गई', असं म्हणत छायाने ए. आर. रहमान यांच्या सोबतचा फोटो शेअर केलाय.