
मराठी मालिकांमधील सुप्रसिद्ध आणि लाडका चेहरा अर्थात अभिनेत्री गायत्री दातार सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. नवनवीन फोटो शेअर करत ती चाहत्यांशी कनेक्ट होत असते.

आता नव्या फोटोशूटचे काही फोटो तिनं तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती हटके अंदाजात दिसते आहे.

या सुंदर फोटोसोबत तिनं हटके कॅप्शनही दिलं आहे. ‘जो आँखों से बयां होते हैं…✨ वो लफ़्ज शायरी में कहाँ होते हैं..!♥️’ असं कॅप्शन देत तिनं हे फोटो शेअर केले आहेत.

'तुला पाहते रे' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली महाराष्ट्राची लाडकी ईशा म्हणजेच अभिनेत्री गायत्री दातार रसिकांच्या मनावर राज्य करतेय. 'तुला पाहते रे' या मालिकेतून गायत्रीनं टेलिव्हिजनमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर तिला खास ओळख मिळाली.

या फोटोंमध्ये ती कमालीची सुंदर दिसतेय. तिचे हे फोटो चाहत्यांच्याही पसंतीस उतरत आहेत.