
शिवजयंतीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या ‘पावनखिंड’ (Pawankhind) या चित्रपटाला (Marathi Movie) बॉक्स ऑफिसवर तुफान प्रतिसाद मिळत आहे.

दुसऱ्या वीकेंडलाही या चित्रपटाने चांगली कमाई केली आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने कमाईचा आकडा पोस्ट केला आहे.

पहिल्या आठवड्यात या चित्रपटाने १० कोटी रुपयांचा आकडा पार केला. 'पावनखिंड'ने पहिल्या आठवड्यात 12.17 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.

दुसऱ्या वीकेंडला इतर मोठ्या चित्रपटांची टक्कर असतानाही 'पावनखिंड'ने दणक्यात कमाई केली.

दुसऱ्या वीकेंडमध्ये शुक्रवारी 1.02 कोटी रुपये, शनिवारी 1.55 कोटी रुपये तर रविवारी 1.97 कोटी रुपयांची कमाई या चित्रपटाने केली.

पहिला आठवडा आणि दुसरा वीकेंड मिळून आतापर्यंत या चित्रपटाने 16.71 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.

पावनखिंड

लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar) यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होणाऱ्या शिवराज अष्टकातील हा तिसरा चित्रपट आहे.