
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती आणि उद्योगपती राज कुंद्राला अश्लील चित्रपट बनवून इंटरनेटवर प्रसारित केल्याबद्दल अटक करण्यात आली आहे.

राज कुंद्राला आणि चित्रपटसृष्टीला पुन्हा एकदा ट्रोल करण्यात येत आहे. सोशल मीडियावर लोक राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीविरोधात संताप व्यक्त करत आहेत.

लोक या दोघांवर मीम्स बनवून आपली क्रिएटीव्हीटी दाखवत आहेत. हे मीम्स पाहून तुम्हीही हसाल. राज कुंद्राला अटक झाल्यापासून सोशल मीडिया मीम्सनं भरलेलं आहे.

तुम्ही काही मीम्स पाहिले असतील मात्र आम्ही तुमच्यासाठी जवळजवळ सर्व लोकप्रिय मीम्स एकत्र केले आहेत. राज कुंद्रा आणि त्यांची पत्नी शिल्पा शेट्टी यांचं नाव सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे.

काही लोक राज-शिल्पाची खिल्ली उडवत आहेच तर अनेक चाहते त्यांचं समर्थनही करत आहेत.

हे सगळे फोटो आणि मीम्स सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.

अश्लील चित्रपट प्रकरणात एक नवीन खुलासा समोर आला आहे. हॉटशॉट अॅप निलंबित झाल्यानंतर राज कुंद्राने (Raj Kundra) प्लॅन बी बनवला होता. प्रदीप बक्षी याच्याशी व्हॉट्सअॅप चॅटमध्ये गुगल प्लेने आपल्या स्टोअरमधून राज कुंद्राचे हॉटशॉट अॅप काढून टाकल्यानंतर देखील राज कुंद्रा नवीन योजना आखत असल्याचे समोर आले आहे.

राज कुंद्राने सगळा बोल्ड कंटेंट काढून Play Store वर पुन्हा हॉटशॉट सुरू करण्याची तयारी केली होती. गुगल प्लेने संपर्क साधलेल्या मेलचा तपशीलही या चॅटमध्ये आहे.

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि प्रसिद्ध उद्योगपती राज कुंद्रा यांना अश्लील चित्रपट बनवण्याच्या प्रकरणात एस्प्लानेड कोर्टाने 23 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मंगळवारी क्राईम ब्रांचची टीम त्याला भायखळा तुरुंगात नेत असताना, तो निराश दिसत होता.

या दरम्यान राज कुंद्रा यांनी प्रश्नांची उत्तरेदेखील दिली नाहीत. मुंबई पोलेस अनेकवेळा भायखळा येथे आरोपींना ठेवतात आणि येथूनच त्यांची चौकशी केली जाते.