
अमेरिकेतील न्यूयॉर्कमधील मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्टमध्ये हा कार्यक्रम पार पडला. हॉलिवूडपासून ते बॉलिवूडपर्यंत, जगभरातील बड्या सेलिब्रिटींनी मेट गाला 2023 च्या रेड कार्पेटवर त्यांच्या सौंदर्याची झलक दाखवली.

भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी यांची एकुलती एक मुलगीही येथे उपस्थित होती. ईशा अंबानी तिच्या महागड्या कपड्यांमुळे चर्चेत आली आहे.

ईशा अंबानी कोट्यवधी किमतीचे हिरे, रत्ने आणि मोती जडलेल्या काळ्या साडीत दिसली. ता तिच्या पोशाखाची सगळीकडे चर्चा रंगली आहे.

हा महागडा पोशाख नेपाळी कॉस्च्युम डिझायनर प्रबल गुरुंगने डिझाइन केला आहे. मेट गाला स्टायलिस्टने स्वतः सोशल मीडियावर हे फोटो शेअर केले आहेत.

ईशा अंबानीच्या पोशाखासोबतच तिने घेतलेल्या बॅगच्या किमतीने सर्वत्र लक्ष वेधून घेतले होते. बॅगचा आकार बाहुलीच्या चेहऱ्यासारखा होता. बॅगची ऑनलाइन किंमत $30,550 म्हणजेच जवळपास 24,97,951 रुपये इतकीआहे.

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या कुटुंबातील महिला त्यांच्या महागड्या दागिन्यांमुळे आणि कपड्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात.