
टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत आपल्या अभिनयाची वेगळी छाप सोडणारी अभिनेत्री मौनी रॉय प्रेक्षकांची आवडती झाली आहे. तिने आपल्या सौंदर्याने लोकांना वेड लावलं आहे. सोशल मीडियावर सक्रिय असलेली मौनी रॉय तिच्या चाहत्यांना नेहमीच आश्चर्यचकित करते.

आता तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. मोनीचा अतिशय बोल्ड अवतार चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.

अभिनेत्री मौनी रॉयच्या नव्या फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये तिने तिचा ग्लॅमरस लूक दाखवला आहे.

अभिनेत्री मौनी रॉयने वेगवेगळ्या ब्लू शिमरी आउटफिटमध्ये फोटोशूट केले आहे. मौनी यावेळी वेगवेगळ्या पोज देताना दिसत आहे.

काही फोटोंमध्ये ती कारमधून उतरताना दिसत आहे आणि काहीमध्ये ती सोफ्यावर पडून पोज देताना दिसत आहे.