
अभिनेत्री आरती सिंह ही विवाहबंधनात अडकली.आरतीने लग्नात लाल रंगाचा लेहंगा परिधान केला होता. लग्नातील लूक आरतीने सोशल मीडियावर शेअर केलाय. तिच्या या लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळतेय.

25 एप्रिलला तिने लग्नगाठ बांधली. दीपक चौहान याच्यासोबत ती लग्नबंधनात अडकली आहे. तो यशस्वी उद्योजक आहे. त्याची एक इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी आहे. दीपक त्या कंपनीचा संस्थापक आहे.

रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीजचा तो ब्रँड अॅबॅसिडर आहे. आरती आणि दीपकपेक्षा 1 वर्षाने मोठी आहे. एका नातेवाईकाच्या माध्यमातून आरती आणि दीपक यांची ओळख झाली.

दीपक आणि आरती यांचं अरेंज मॅरेज आहे. लग्न ठरल्यानंतर कोर्टशिप पीरियडदरम्यान त्यांनी एकमेकांसोबत वेळ घालवला. या वेळात त्यांना एकमेकांचा स्वभाव कळाला.

आरती ही प्रसिद्ध अभिनेत्री आहे. बिग बॉसच्या 13 व्या सिझनमध्ये ती सहभागी झाली होती. या दरम्यान तिला प्रसिद्धी मिळाली. सोशल मीडियावरही ती प्रसिद्ध आहे. तिचा मोठा चाहतावर्ग आहे.