
अभिनेत्री प्राजक्ता माळी ही आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे... अभिनयासोबतच प्राजक्ता वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करत असते.

प्राजक्तराज हा ज्वेलरी ब्रँडही प्राजक्ताने सुरु केला आहे. त्याचबरोबर आता प्राजक्ताने एक अलिशान फार्महाऊस खरेदी केलं आहे.

प्राजक्तकुंज हे नवं फार्महाऊस प्राजक्ताने खरेदी केलंय. कर्जतमध्ये निसर्गाच्या कुशीत प्राजक्ताचं हे फार्महाऊस आहे. इथं राहायचं असेल तर साधारणपणे किती खर्च येऊ शकतो?

प्राजक्तकुंज या प्राजक्ताच्या फार्महाऊसवर राहायचं असेल तर एका दिवसासाठी 15 हजार रूपये खर्च येतो. इथे राहण्यासाठी उत्तम सोय आहे. या पैशांमध्येच तुमच्या फूडचीही व्यवस्था आहे. या पैशांमध्ये तुमचं जेवणाची समावेश आहे.

प्राजक्ताच्या या फार्महाऊसवर तुम्ही मित्र किंवा फॅमिलीसोबत जाऊ शकता. सहा लोकांना इथे राहता येईल. स्विमिंग पूल आहे. शिवाय विविध गेम्स आहेत. धकाधकीच्या जीवनातून थोडा विरंगुळा हवा असेल तर तुम्ही इथे जाऊ शकता.