
आज जागतिक पर्यावरण दिवस आहे. त्यानिमित्त अमृता फडणवीस यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. पर्यावरणदिना निमित्त अमृता फडणवीस यांनी निसर्गाच्या सानिध्यातील फोटो शेअर केले आहेत.

अमृता फडणवीस यांना या फोटोंवरून ट्रोल केलं जात आहे. नेमकं म्हणायचं काय आहे हे कळायला अवघड आहे, असं नेटकरी म्हणत आहेत.

काही लोक मानवनिर्मित जगात हरवून जातात तर काही निसर्गाच्या जंगलात स्वतःला शोधण्यासाठी भटकतात, असं म्हणत अमृता यांनी फोटो शेअर केला आहे.

पर्यावरणावर प्रेम करा, पर्यावरणाला मिठी मारा. स्वतःला शोधण्यासाठी आणि आपल्या जीवनाचा उद्देश शोधण्यासाठी निसर्गाचं संरक्षण करा. निसर्गाच्या सानिध्यात जा, असं हे फोटो शेअर करताना अमृता फडणवीस म्हणाल्या आहेत.

अमृता फडणवीस वेगवेगळ्या लुकमधले फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. त्यांचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत असतात.