
‘जाऊ बाई गावात’ या रिअॅलिटी शोचा महाअंतिम सोहळा पार पडला. रमशा फारुकी ही ‘जाऊ बाई गावात’ शोच्या पहिल्या सिझनची महाविजेती ठरली.

गावच्या मातीत रंगलेल्या या रिअॅलिटी शोमध्ये रमशाने आपली वेगळी छाप पाडली. या सिझनच्या विजेतेपदावर तिने आपलं नाव कोरलं. रमशाला 20 लाखाचा धनादेश आणि 'जाऊ बाई गावात'ची मानाची ट्रॉफी मिळाली.

पण तुम्हाला माहिती आहे का? तारक मेहता का उल्टा चश्मा या सुपरहिट मालिकेतही रमशाने काम केलं आहे. या लोकप्रिय मालिकेत रमशा दिसली.

रीटा रिपोर्टरचा रोल रमशाने केला. गणेश चतुर्थीच्या एका एपिसोडमध्ये रीटा रिपोर्टरची भूमिका रमशाने केली आहे. गोकुळधाम सोसायटीमध्ये दिसली होती.

रमशाने काही टीव्ही शोमध्ये काम केलेलं आहे. शिवाय थिएटरमध्येही तिने काम केलं आहे. काल 'जाऊ बाई गावात'ची मानाची ट्रॉफीही तिने पटकावली आहे.