‘जुळून येती रेशीमगाठी’ मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्याने बांधली लग्नगाठ

Julun Yeti Reshim Gathi Fame Actor Kaustubh Diwan Wedding : 'जुळून येती रेशीमगाठी' मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्याने लग्नगाठ बांधली आहे. सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत अभिनेत्याने ही आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांना दिलीय. या फोटोंची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे.

आयेशा सय्यद | Updated on: Apr 20, 2024 | 7:54 PM
1 / 5
'जुळून येती रेशीमगाठी' मालिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. 2015 ला आलेल्या या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. या मालिकेतील पात्र त्यांचे डायलॉग आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत.

'जुळून येती रेशीमगाठी' मालिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. 2015 ला आलेल्या या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. या मालिकेतील पात्र त्यांचे डायलॉग आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत.

2 / 5

'जुळून येती रेशीमगाठी' मालिकेतील प्रसिद्ध अभिनेता विवाहबद्ध झाला आहे. नुकतंच त्याने याबाबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत. त्याच्या लग्नाच्या फोटोंची चर्चा होतेय.

3 / 5

'जुळून येती रेशीमगाठी' मालिकेत आदित्य नगरकर ही भूमिका साकारणारा अभिनेता कौस्तुभ दिवाण याने लग्नगाठ बांधली आहे. किर्ती कदम हिच्याशी त्याने लग्नगाठ बांधली आहे. कौस्तुभ आणि किर्तीच्या मेहंदीचे फोटो...

4 / 5

कौस्तुभ दिवाण आणि किर्ती कदम यांचा काही दिवसांआधी साखरपुडा झाला. त्यानंतर यी दोघांनी लग्नगाठ बांधली आहे. मित्रमंडळी आणि कुटुंबियांच्या उपस्थितीत या दोघांचा लग्नसोहळा पार पडला.

5 / 5

कौस्तुभ आणि किर्तीच्या लग्न सोहळ्याला कलाकारांनी हजेरी लावली. या दोघांना सहजीवनासाठी सदिच्छा दिल्या. #KiandKau हा हॅशटग वापरत कौस्तुभने हे फोटो शेअर केलेत. या दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव होतोय.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us