
आज (10 ऑक्टोबर) देशभरात उत्साहाने साजऱ्या केल्या जाणाऱ्या नवरात्रोत्सवाचा तिसरा दिवस आहे. या दिवसांतील नऊ मानाच्या रंगांपैकी आज ‘राखाडी’ अर्थात ‘ग्रे’ रंगाचा दिवस आहे.

सध्या नवरात्री हा सण जोशात साजरा केला जात आहे. या दिवसांत नऊ रंगांना विशेष स्थानं दिलं जातं. सगळ्या स्त्रिया या दिवसांत प्रत्येक दिवशीच्या रंगानुसार पेहराव परिधान करतात.

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’मध्ये ‘ज्योतिका’, ‘गणपती बाप्पा मोरया’ मालिकेत ‘देवी लक्ष्मी’ साकारत घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री नयना मुके हिने या निमित्ताने खास फोटोशूट केले आहे.

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध मालिका 'देवयानी'मध्येसुद्धा नयनाने महत्वाची भूमिका साकारली होती. अभिनेत्री नयना मुके हिला 'फायनल डिसीजन' या नाटकातील व्यक्तिरेखेसाठी 'दादासाहेब फाळके पुरस्कारा’ने गौरवण्यात आले आहे.

नवरात्रीच्या निमित्ताने नयना राखाडी रंगाच्या साडीसह टेम्पल ज्वेलरी परिधान करून सजली होती. छायाचित्रकार स्वप्नील रास्ते यांनी नयनाची ही सुंदर छायाचित्र टिपली आहेत.