
अभिनेत्री जान्हवी कपूर आता बॉलीवूडमध्ये स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व तयार केले आहे. तिने स्वतंत्र चाहतावर्ग तयार केला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमात सक्रिय असलेली दिसून येते.

जान्हवी सध्या तिच्या आगामी गुड लक जेरीच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या प्रमोशनची सुरुवातिलाच ती अत्यंत स्टाईलिश अंदाजात दिसून आली.

जान्हवी कपूरची तुलना बॉलिवूडमधील सर्वात स्टायलिश अभिनेत्र्यांमध्ये केली जाते. जान्हवी डिनर, पार्टीपासून ते तिच्या जिमच्या वेअरसाठी देखील चर्चेत असते. आता पुन्हा एकदा ती चर्चेत आली आहे.

जान्हवी कपूरच्या ड्रेसवरुन तिची तुलना अभिनेत्री उर्फी जावेदसोबत केली जात आहे. तिने आगामी चित्रपट 'गुड लक जेरी' च्या कार्यक्रमादरम्यानचे काही फोटो जान्हवीने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

जान्हवी कपूर निळ्या रंगाच्या कटआउट ड्रेसमध्ये दिसत आहे. जान्हवीच्या या वन शोल्डर ड्रेसला समोरून लांब कट आणि बाजूला काळ्या रंगात वेगळा लूक आहे. याशिवाय ड्रेसमध्ये थाई हाय स्लिटही आहे. ज्यामध्ये जान्हवी खूपच ग्लॅमरस दिसत आहे.

तिने ड्रेसबरोबरच ब्लैक हील्सने तिचा लूक पूर्ण केला. मात्र तिच्या या फोटोवर युझर्सने अभिनेत्रीने उर्फी जावेदची कॉपी केली असल्याचे म्हटले आहे. या पोस्टवर अनेक युझर्सनी अश्या कमेंट तिला दिल्या आहेत.

एका युझर्सने लिहिले आहेकी ‘उर्फी जावेद से प्रभावित.’.' दुसर्याने लिहिले- 'क्षणभर असे वाटले की उर्फी जावेद आहे.'आणखी एकाने लिहिले आहेकी - 'ही स्टाइल हुबेहूब उर्फी जावेदसारखी आहे, त्याचवेळी अन्य काहींनी जान्हवीच्या लूकचे कौतुकही केले आहे.