
'बिग बॉस मराठी'चा यंदाचा सिझन चर्चेत राहिलाय तो घरातील भांडणांमुळे... 'बिग बॉस मराठी'च्या घरात सतत कुणाची ना कुणाची भांडणं होत असतात. आता निक्की तांबोळी आणि अभिजीत सावंत या दोघांमध्ये वाद झाला आहे.

'बिग बॉस मराठी'चा नवा प्रोमो समोर आला आहे. यात निक्की आरडाओरडा करताना दिसत आहे. अभिजीतचे चाहत्यांची इच्छा होती की तो कॅप्टन बनेल. पण याने अंकिताला बनवलं, असं निक्की म्हणते.

निक्कीच्या या विधानाला अभिजीत सावंत उत्तर देतो. आमच्यात लोकशाही आहे. तुमच्यात हुकुमशाही होती. तुम्ही खेळातही लोकांच्या भावनांचा खेळ केलाय, असं अभिजीत निक्कीला म्हणतो.

निक्कीदेखील अभिजीतला उत्तर देते. हे सगळं करुन तुला मला वाईट ठरवायचं असेल... तर आजपासून माझ्यासोबत बोलू नको, असं निक्की म्हणते. 'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन आजपासून आणखी रंगतदार होणार आहे. निक्की आणि अभिजीतची भांडणंही चर्चेत आली आहेत.

'बिग बॉस मराठी'चा खेळ आता अंतिम टप्प्यात आला आहे. त्यामुळे हा खेळ जिंकण्याची सदस्यांमध्ये चांगलीच चढाओढ होत असलेली पाहायला मिळत आहे. सदस्यांनी आपला खेळदेखील बदलला आहे. आजच्या भागात अभिजीत निक्कीला सुनावताना दिसणार आहे.