
निक्की तांबोळी हिला खरी ओळख ही बिग बाॅसमध्ये सहभागी झाल्यापासूनच मिळालीये. निक्की तांबोळी ही कायमच चर्चेत असते. नुकताच निक्की तांबोळी हिचे काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे.

निक्की तांबोळी हिला सोशल मीडियावर सध्या तूफान ट्रोल केले जात आहे. निक्की तांबोळी ही नुकताच जिममध्ये जाताना स्पाॅट झालीये. मात्र, निक्की तांबोळी हिचा लूक पाहून अनेकांना मोठा धक्का बसलाय.

निक्की तांबोळी हिच्या फोटोवर आणि व्हिडीओवर कमेंट करत अनेकांनी म्हटले की, या निक्कीने तिच्या चेहऱ्याचे हे नेमके काय करून घेतले आहे. अगोदरच निक्की तांबोळी सुंदर दिसत होती.

निक्की तांबोळी हिने चेहऱ्याची सर्जरी केल्याच्या चर्चा आहेत. मात्र, लोकांना निक्की तांबोळी हिचा अगोदरचाच लूक आवडला होता. सर्जरी केल्यानंतर निक्की काही तरी वेगळी दिसत असल्याचे अनेकांनी म्हटले.

निक्की तांबोळी हिचा व्हिडीओ आणि फोटो तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसांपासून निक्की तांबोळी हिच्या फॅन फाॅलोइंगमध्ये मोठी वाढ झालीये.