
तृणमुल काँग्रेसच्या खासदार आणि अभिनेत्री नुसरत जहाँ यांच्याकडे ७० लाख रुपयांची बीएमड्ब्लू ५ सीरिज कार आणि एक महागडी फोर्ड इंडीव्हर कार देखील आहे.

नुसरत जहाँ ज्या घरात राहतात ते घर आलिशान असून त्यांच्या घराची किंमत जवळपास १ कोटी रुपये आहे. घरात अनेक सुविधा आहे. नुसरत जहाँ कायम त्यांच्या घराचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असतात.

नुसरत जहाँ यांच्याकडे दागीने देखील देखल प्रचंड आहेत. नुसरत जहाँ फक्त त्यांच्या खासगी नाही तर प्रोफेशनल आयुष्यामुळे देखील चर्चेत असतात.

नुसरत जहाँ यांच्या एकूण संपत्तीबद्दल सांगायचं झालं तर, त्यांच्याकडे रोख रक्कम आणि दागीने मिळून ९०.९ लाख रुपयांची संपत्ती असल्याची माहिती मिळत आहे. त्यांच्याकडे २ कोटी रुपयांचा इतर संपत्ती आहे.

नुसरत जहाँ सिनेमात काम करण्यासाठी जवळपास ५० ते ७० लाख रुपये मानधन घेतात. सध्या सर्वत्र नुसरत जहाँ यांच्या संपत्तीची चर्चा रंगत आहे. त्यांच्याकडे एकूण २.९० कोटी रुपयांची संपत्ती आहे.