
अभिनेत्री पूजा सावंत मराठी सिनेसृष्टीतील ग्लॅमरस चेहाऱ्यांपैकी एक आहे. उत्तम अभिनेत्री आणि जबरदस्त नृत्यागंना असलेली पूजा सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असते.

पूजा तिचे अनेक नवनवीन फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. तिचे हे फोटो तिच्या चाहत्यांनासुद्धा प्रचंड आवडतात. आता पूजानं ग्लॅमरस अंदाजात फोटो शेअर केले आहेत.

नारंगी रंगाच्या सुंदर ड्रेसमध्ये तिनं हे नवं फोटोशूट केलं आहे. या फोटोंमध्ये ती कमालीची सुंदर दिसतेय.

‘दगडी चाळ’, ‘लापाछपी’, ‘बोनस’, ‘क्षणभर विश्रांती’ असे सुपरहिट चित्रपट देणारी पूजा सध्या तिच्या नव्या प्रोजेक्ट्सवर काम करतेय.

आता तिचे हे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. तिचा हा अंदाज तिच्या चाहत्यांना चांगलाच पसंतीस उतरला आहे. चाहत्यांनी तिच्या फोटोंवर जबरदस्त कमेंट्स केल्या आहेत.