
पाकिस्तान माजी पंतप्रधान आणि क्रिकेट टीमचे कॅप्टन इमरान खान यांचं बॉलीवूड कनेक्शनची एकेकाळी चर्चा होती. बॉलीवूडमधील अनेक जण हे इमरान खान यांचे चाहते होते. इतकंच नाही, तर इमरान खान यांचं अभिनेत्री रेखा आणि जीनत अमान यांच्यासह अनेक बॉलीवूड एक्ट्रेससह अफेयर्स असल्याची चर्चा होती.

इमरान खान आणि अभिनेत्री रेखा यांच्यात अफेयर असल्याची चर्चा 90 च्या दशकात होती. रिपोर्ट्सनुसार, इमरान खान भारतात रेखासोबत एक महिना राहिले होते. मात्र मी कधीच लग्न करणार नाही, इमरान खान यांच्या या वक्तव्याची बातमी माध्यांमध्ये प्रसिद्ध झाली होती. या दरम्यान रेखा आणि इमरान खान दोघे अनेकदा एकत्र स्पॉट झाले होते. मात्र रेखाने याबाबत कधीच वाच्छता केली नाही.

इमरान खान 1979 साली भारतात क्रिकेट खेळण्यासाठी आले होते. तेव्हा इमरान खान यांचं नाव हे अभिनेत्री जीनत अमान यांच्यासोबत जोडलं गेलं होतं. तेव्हा इमरान खान यांनी आपला वाढदिवस जीनत अमान यांच्यासोबत साजरा केल्याचा दावा मीडिया रिपोर्टमध्ये करण्यात आला होता.

इमरान खान यांचं नाव शबाना आझमी यांच्यासोबतही जोडण्यात आलं होतं. तेव्हा हे दोघे आपल्या क्षेत्रातील स्टार होते. मात्र इमरान आणि शबाना आझमी या दोघांनी कधीच याबाबत कोणतीही विधान केलं नाही.

इमरान खान आणि बंगाली अभिनेत्री मुनमुन सेन यांच्यात एकेकाळी काही तरी असल्याची चर्चा होती. इमरान खान यांना मुनमुन आवडायची असंही म्हटलं जातं.