
टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी हिची मुलगी पलक तिवारी ही गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आहे. नुकताच पलक हिने सलमान खान याच्या चित्रपटातून बाॅलिवूडमध्ये पदार्पण केले आहे.

किसी का भाई किसी की जान या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना देखील पलक तिवारी ही दिसली होती. काही दिवसांपूर्वीच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये पलक मोठा खुलासा करताना दिसली.

नुकताच पलक तिवारी हिने सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर केले आहेत. पलक तिवारी हिच्या या फोटोशूटममुळे इंटरनेटचा पारा चांगलाच वाढलेला दिसतोय.

अत्यंत बोल्ड लूकमध्ये पलक तिवारी हिने हे फोटोशूट केले आहे. पलक तिवारी हिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. अनेकांनी यावर कमेंट देखील केल्या आहेत.

प्रिंटेड शॉर्ट आउटफिटमध्ये पलक तिवारी हिने हे फोटोशूट केले आहे. अनेकांनी या फोटोशूटमुळे पलक तिवारी हिला खडेबोल सुनावण्यास देखील सुरूवात केलीये.