
श्वेता तिवारी हिची मुलगी पलक तिवारी ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. विशेष म्हणजे पलक तिवारी ही सोशल मीडियावर सक्रिय असून आपल्या चाहत्यांसाठी कायमच खास फोटो शेअर करताना पलक दिसते.

किसी का भाई किसी की जान या चित्रपटात थेट सलमान खान याच्यासोबत काम करण्याची संधी ही पलक तिवारी हिला मिळाली आहे. या चित्रपटातील अनेक गाणे रिलीज झाले आहेत. पलकचा चित्रपटातील लूकही पुढे आलाय.

पलक तिवारी ही कायमच सोशल मीडियावर फोटो शेअर करताना दिसते. नुकताच पलक तिवारी हिने काही खास आणि बोल्ड फोटो हे सोशल मीडियावर शेअर केले आहेत. पलकचे हे फोटो चाहत्यांना आवडले आहेत.

पलक तिवारी हिचे फोटो पाहून अनेकांनी कमेंट करण्यास सुरूवात केलीये. एका युजर्सने थेट म्हटले की, बोल्डनेस मध्ये पलक तिवारी ही आई श्वेता हिला देखील मागे टाकते.

आता पलक तिवारी हिने शेअर केलेले हे फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. पलकच्या हा फोटोवर चाहते देखील फिदा झाले आहेत.