
अभिनेत्री पलक तिवारी ही नेहमीच चर्चेत असते. श्वेता तिवारी हिच्या लेकीने नुकताच सलमान खान याच्या चित्रपटातून बाॅलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. विशेष म्हणजे पलकच्या अभिनयाचे काैतुक केले गेले.

सध्या पलक तिवारी ही मालदीवमध्ये असून धमाल करताना दिसत आहे. नुकताच पलक तिवारी हिने मालदीवमधील काही खास फोटो हे सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

पलक तिवारी हिने समुद्रकिनाऱ्यावर खास पोज देत हे फोटोशूट केले आहे. विशेष म्हणजे पलक तिवारी हिचा हा लूक तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडल्याचे दिसत आहेत.

पिवळ्या रंगाच्या बिकिनीमध्ये पलक तिवारी ही दिसत आहे. पलक हिने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिचा लूक एकदम जबरदस्त असा दिसत आहे. चाहत्यांना तिचा हा लूक आवडलाय.

पलक तिवारी हिच्या बाॅलिवूड पदार्पणासाठी तिची आई श्वेता तिवारी हिने अत्यंत जास्त मेहनत घेतलीये. पलक तिवारी ही इब्राहिम अली खान याला डेट करत असल्याचे सांगितले जातंय.