
'बिग बॉस मराठी'चा यंदाचा सिझन चांगलाच गाजतो आहे. यातकाही सदस्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. बारामतीचा रीलस्टार सूरज चव्हाणलाही प्रेक्षकांचा पाठिंबा मिळतोय. 'बिग बॉस मराठी'च्या घरातील सदस्यही त्याला सपोर्ट करत आहेत.

'बिग बॉस मराठी'च्या घरातील सर्वच सदस्य चर्चेत आहेत. पण गुलीगत सूरज चव्हाणची सर्वाधिक चर्चा होत आहे. 'बिग बॉस मराठी'च्या घरात सुरुवातीचे काही दिवस सूरज शांत होता. त्याला खेळ कळत नव्हता. पण आता तो चांगला खेळतोय.

अंकिता, पॅडी, डीपी यांनी वेळोवेळी सूरजची मदत केली आहे.. आता मदत केलेल्या पॅडीलाच सूरज उलट उत्तर देत असलेलं आजच्या भागात पाहायला मिळणार आहे. त्याचा नवा प्रोमो समोर आला आहे.

'बिग बॉस मराठी'चा नवा प्रोमो समोर आला आहे. टास्कदरम्यान पॅडी सूरजला म्हणत आहेत, अरे मध्ये बोलू नको. टास्कनंतर पॅडी सूरजसोबत बोलायला येतो. पण सूरज मात्र त्यांना नकार देतो. तू अशी किंमत ठेवणार नाहीस... तर तुझ्यासाठी कोणी उभं राहणार नाही, असं अंकिता सूरजला समजावते.

सॉरी मगाशी ओरडलो त्याबद्दल. यापुढे तू काही गडबड करत असशील तर सांगणार नाही. तुला जसं वागायचंय तसं वाग, असं पॅडी सूरजला म्हणतो. आता सूरज पॅडीसोबत बोलायला जाणार का? हे पाहावे लागेल.